अरवली पर्वतरांगांची व्याख्या करण्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या तज्ज्ञ समितीने संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ आणि इतर हितचिंतकांशी सल्लामसलत करावी, जेणेकरून सर्वसामान्य जनतेचे म्हणणे ऐकले जाईल, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला.
सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची व विपुल एम. पंचोली यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने म्हटले की, ‘समितीची रचना मोठी असू शकत नाही, कारण तिचे व्यवस्थापन करणे अवघड होते. आम्ही ३० लोकांची रचना ठेवू शकत नाही, कारण तिचे व्यवस्थापन करणे अवघड होईल. समितीने तज्ज्ञांशी सल्लामसलत करायला हवी. त्यात पाच-सात सदस्य असायला हवेत. आम्ही याची नोंद आदेशात घेऊ’.





