नाशिक : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) ‘कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट- पदवी’च्या २०२६ परीक्षेच्या (सीयूईटी-२०२२६) वेळापत्रकात बदल केला आहे. २८ मे रोजी होणाऱ्या दोन्ही सत्रांची परीक्षा पुढे ढकलली आहे. बकरी ईदच्या सुटीच्या तारखेत झालेल्या बदलामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मूळ नियोजनानुसार ‘सीयूईटी’ ११ ते ३१ मे २०२६ या काळात विविध सत्रांमध्ये परीक्षा होणार होती. मात्र, केंद्र सरकारने बकरी ईदची तारीख २७ मे ऐवजी २८ मे जाहीर केल्याने २८ मे रोजी होणाऱ्या परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होऊ शकणार नव्हते. या पार्श्वभूमीवर ‘एनटीए’मार्फत २८ मे च्या सकाळ आणि दुपार सत्रातील परीक्षा स्थगित करण्याच निर्णय घेण्यात आला आहे.





