रामभाऊ महाजन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांचे निधन झाले. वेदांतनगर येथील रामभाऊ महाजन (९०) आणि सिडको एन१ येथील रजनी अत्रे (९४) यांनी निधनानंतर देहदान केले. दोघांच्याही पश्चात मोठा परिवार आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. समाजासाठी त्यांचे योगदान स्मरणीय राहील.

रामभाऊ महाजन

छत्रपती संभाजीनगर : वेदांतनगर येथील रहिवासी रामभाऊ गोपाळ महाजन (वय ९०) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आर. आर. महाजन यांचे ते वडील होत.

रजनी अत्रे

छत्रपती संभाजीनगर : सिडको एन१ येथील रहिवासी, सरस्वती भुवन प्रशालेच्या सेवानिवृत्त शिक्षिका रजनी प्रभाकर अत्रे (वय ९४) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.