अहमदाबाद : गुजरातमधील गीरच्या जंगलात सिंहाच्या दोन छाव्यांचा बेबेसिया विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्याची शंका व्यक्त होत आहे. तर, काही नैसर्गिक कारणे आणि आपापसातील संघर्षामुळे तीन सिंहांचा वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू ओढवला.
गीरच्या जंगलामध्ये कोणत्याही मोठ्या साथीच्या आजाराचा किंवा रोगाचा उद्रेक होण्याची शक्यता मात्र सरकारने फेटाळून लावली. ‘ बेबेसिया विषाणू गोचिडांमार्फत पसरतो आणि बाधित प्राण्यांमध्ये अशक्तपणा, खोकला आणि नाकातून स्राव होण्यास कारणीभूत ठरू शकतो. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वन विभाग आणि पशुवैद्यकांचे पथक युद्धपातळीवर काम करीत आहे,’ असे सांगण्यात आले.
महिला ठार
वायनाड : केरळमधील वायनाडमध्ये जंगली हत्तीने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा पती जखमी झाला.









