नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये ४०० विशेष कॅन्टिन पाच रुपयांत मासे-भाताचे जेवण उपलब्ध करून दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी मंगळवारी केली. यासह त्यांनी विविध कल्याणकारी योजनांचीही माहिती दिली.
अन्नपूर्णा योजनेचे अर्ज २७ मेपासून वितरित करण्यात येणार असून, पात्र महिलांना दरमहा तीन हजार रुपयांचे अर्थसाह्य दिले जाईल; तसेच शाळा, महाविद्यालये आणि मंदिरांच्या एक किलोमीटर परिसरात दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचेही अधिकारी यांनी सभेत सांगितले. ‘राज्यात व्यक्तीचे नव्हे, तर कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले आहे. सरकारच्या भूमिका, संकल्पना प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी जनसंपर्क दौरे आणि बैठका घेतल्या जात आहेत,’ असेही अधिकारी म्हणाले.









