भौतिकशास्त्राचे प्रश्न पाठविणारा अटकेत

महाराष्ट्र टाइम्स

नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तेजस हर्षदकुमार शहा याला अटक केली आहे. शहा 'गॉड' या नावाने सेव्ह असलेल्या व्हॉट्सअॅप अकाउंटचा वापर करत होता. त्याने भौतिकशास्त्राचे प्रश्न लिहून राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) विषयतज्ज्ञ मनीषा हवालदार हिच्या पतीच्या व्हॉट्सअॅपवर पाठवले होते. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

neet exam leak case youth sending physics questions arrested

‘नीट’ पेपर फुटीप्रकरणात ‘गॉड’ नावाने सेव्ह असलेल्या ‘व्हॉट्सअॅप अकाउंट’चा वापर करणाऱ्या तेजस हर्षदकुमार शहा या तरुणाला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी अटक केली. त्याने भौतिकशास्त्राचे प्रश्न हाताने लिहून राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) विषयतज्ज्ञ मनीषा हवालदार हिच्या पतीच्या व्हॉट्सअॅपवर पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले.

सीबीआयच्या पुण्यातील न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर. आर. मेंढे यांनी शहाला दोन दिवसांची प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) सुनावली.

तपासात मनीषा हवालदार यांच्या पतीच्या मोबाइलमधील ‘गॉड’ नावाच्या क्रमांकाशी झालेल्या चॅटमुळे संशय निर्माण झाला होता. सीबीआयने सदाशिव पेठेतील त्यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात काही महत्त्वाचे डिजिटल पुरावे जप्त केले. तपासादरम्यान हवालदार हिने सहआरोपी मनीषा मांढरे यांच्यासोबतचे व्हॉट्सअॅप चॅट डिलीट केल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली; तसेच भौतिकशास्त्र विषयाच्या हस्तलिखित नोट्स जाळून टाकल्याचाही संशय आहे.

 संबंधित वृत्त...३