चेन्नई : महेंद्रसिंह धोनी सरत्या आयपीएल टी-२० क्रिकेटच्या मोसमात एकही लढत खेळला नाही. मात्र, तरीही त्याने आयपीएलमधून निवृत्त घेतलेली नाही. त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघ सोडूच नये, अशी संघव्यवस्थापनाची इच्छा आहे. तो खेळाडू म्हणून खेळणार नसला, तर तो पुढच्या मोसमात संघाचा प्रशिक्षक होऊ शकतो. संघव्यवस्थापनाने तशी पावले टाकली असून, त्याचा निर्णय ४४ वर्षीय धोनीवर सोपवल्याची जोरदार चर्चा आहे.
‘चेन्नई’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) काशी विश्वनाथन यांनी हे संकेत दिले. ते म्हणाले, ‘धोनी संघासोबत हवाच, मग तो खेळाडू, प्रशिक्षक असू शकतो किंवा सल्लागार, प्रेरक. याबाबतचा अंतिम निर्णय त्याचा असेल,’ असे काशी विश्वनाथन यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. ‘आम्ही धोनीबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही,’ असे काशी म्हणाले.









