उष्माघाताने पाच दगावले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नागपूरमध्ये उष्माघाताने पाच जणांचा मृत्यू झाला. लकडगंज, सक्करदरा, मोठा ताजबाग आणि कळमना परिसरात मृतदेह आढळले. मृतांमध्ये चार अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे. उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

उष्माघाताने पाच दगावले

नागपूर : विविध ठिकाणी उष्माघाताने पाच जणांचा मृत्यू झाला. पहिली घटना लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील क्रिष्णा भोजनालयाजवळील उड्डाणपुलाखाली उघडकीस आली. बुधवारी पहाटे या ठिकाणी ६५वर्षीय ज्येष्ठाचा मृतदेह आढळला. दुसरी घटना सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सक्करदरा चौकात समोर आली. उड्डाणपुलाखाली ५०वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. मोठा ताजबाग परिसरातही ५५वर्षीय इसम मृतावस्थेत आढळला. याच परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरातही ६०वर्षीय इसम मृतावस्थेत आढळला. चौघांचीही ओळख पटलेली नाही. चौघांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चारही प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पाचवी घटना कळमना परिसरात घडली. मात्र, ५०वर्षीय मृताची ओळख पटू शकली नाही.