राजगुरुनगर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथील मंदिर सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३१ मेची अंतिम मुदत दिली असली, तरीही कामे अद्याप पूर्ण न झाल्याने मंदिर पुन्हा उघडण्यासाठी आणखी किमान १५ दिवस लागू शकतात.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ३१ मे रोजी मंदिर उघडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे. मात्र, मंदिर बांधकामाशी संबंधित सूत्रांनी ते शक्य नसल्याचे म्हटले आहे. मुख्य मंदिराच्या सभा मंडपाचे काम व परिसरातील राडारोड्याची साफसफाई करण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. यामुळे भीमाशंकरचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना १५ जून पर्यंत वाट पाहावी लागू शकते, असे माहितगार सूत्रांचे म्हणणे आहे.
सविस्तर वृत्त... ४






