राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरी (जि. अहिल्यानगर) तालुक्यातील नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज, शनिवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दुपारी ३ वाजता प्रदेश कार्यालयात तनपुरे यांचा प्रवेश सोहळा होईल. या प्रवेशाने शरद पवार राष्ट्रवादी पक्षाला अहिल्यानगर जिल्ह्यात धक्का बसला आहे.
प्राजक्त तनपुरे यांनी शुक्रवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सुळे यांना भाजप प्रवेशाची माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्राजक्त तनपुरे यांना विधान परिषदेच्या अहिल्यानगर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार आहे.









