Dilapidated Condition Of The Road In Vrindavan Colony Citizens Despair
वृंदावन कॉलनी रस्त्याची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २४ मधील खोडे मळा परिसरातील वृंदावन कॉलनीत श्याम हाइट्ससमोरील अंतर्गत रस्त्याची गेल्या ३० वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.
हौसाई अपार्टमेंटपासून नाल्यापर्यंतचा रस्ता माती व दगडांनी भरलेला असून, पावसाळ्यात चिखल आणि पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. उन्हाळ्यात धुळीचाही सामना करावा लागतो. या परिसरातील नागरिक नियमित घरपट्टी व पाणीपट्टी भरत असतानाही मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. महापालिकेच्या सहा पंचवार्षिक निवडणुका होऊनही रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही. महापालिकेने तातडीने दखल घेऊन रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण अथवा डांंबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.