कारच्या धडकेत पादचारी ठार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
horrific accident on highway 60 year old pedestrian killed
नाशिकरोड : महामार्गाने पायी जाणाऱ्या पादचाऱ्यास भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. हा अपघात नाशिक - पुणे महामार्गावरील पळसे गाव कमानीजवळ बोल्हाई माता पान स्टॉल दुकानासमोर गुरुवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास झाला. भाऊसाहेब आबाजी सहाणे (वय ६०, रा. पळसे) असे या अपघातात मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.