Renowned Film Director Ved Rahi Passes Away Condolences In The Film Industry
वेद राही यांचे निधन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
ठाणे : ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक , लेखक वेद राही (वय ९३) यांचे रविवारी ठाणे येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.
हिंदी, डोंगरी भाषांत लेखन करणारे वेद राही यांचा दोन वर्षांपूर्वी साहित्य अकादमीतर्फे फेलोशिप देऊन सन्मान करण्यात आला. सन १९६६मध्ये ‘ये रात फिर न आएगी’ चित्रपटाचे पटकथा लेखक म्हणून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘पवित्र पापी’, ‘आप आए बहार आयी’, ‘बेईमान’, ‘चरस’ आदी २५हून अधिक चित्रपटांसाठी पटकथा आणि संवाद लिहिले. सन १९७३मध्ये ‘प्रेम परबत’ चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात प्रवेश केला.‘दरार’, ‘काली घटा’ या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. सन २००१मधील सुधीर फडके निर्मित ‘वीर सावरकर’ चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन त्यांनी केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.