आयुक्तालयातर्फे एकता दौड

Contributed by: छत्रपती संभाजीनगर,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
unity run organized on the birth anniversary of sardar vallabhbhai patel
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती व राष्ट्रीय एकता दिवस निमित्ताने पोलिस आयुक्त कार्यालयापासून ते सरदार वल्लभभाई पटेल पुतळा शहागंज एकता दौडचे आयोजन ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. सकाळी ७.३० ते ९ वाजेच्या दरम्यान या एकता दौडचे आयोजन करण्यात आले. या एकता दौडमध्ये पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस अंमलदारसह त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग नोंदविला. याशिवाय राष्ट्रीय एकता दिवस निमित्ताने एकतानगर, गुजरात येथे एकता परेडचे थेट प्रक्षेपण पोलिस आयुक्तालय व सर्व १७ पोलिस स्टेशनच्या आवारात एकता परेडचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी एकता परेडच्या अनुषंगाने उपस्थितांनी एकता व अखंडता अबाधित राखण्याची शपथ या वेळी घेण्यात आली.