नाशिकरोड : येथील आर्टिलरी सेंटर रोडवरील खोले मळा येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून दोघा जणांनी युवकाला लाकडी दांडक्याने मारहाण करून दमदाटी केली.
आर्टिलरी सेंटर रोड येथील दीपक किराणा जवळ राहणारा युवक साहिल शंभू वर्मा याला गुरुवारी सकाळी संतू रावत व त्याच्या मित्राने जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली. साहिल याला लाथाबुक्क्यांनी व दांडक्याने मारहाण केली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.