४० रुपयांनी महागलेनवी दिल्ली : ‘अमूल’ ब्रँडअंतर्गत दुग्धजन्य उत्पादने विकणाऱ्या ‘गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन’ने (जीसीएमएमएफ) तुपाच्या दरात लिटरमागे ४० रुपयांची वाढ केली आहे. तसेच, अमूल बटरच्या ५०० ग्रॅम पॅकची किंमतही १५ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. वाढलेला उत्पादनखर्च लक्षात घेऊन ही दरवाढ करण्यात आल्याचे ‘जीसीएमएमएफ’ने म्हटले आहे.
‘गोकुळ’वर पाच
नामनिर्देशित सदस्य?
मुंबई : राज्यातील वार्षिक ५०० कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांच्या समित्यांवर सरकारकडून पाच नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी सहकार कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ‘गोकुळ’ची सत्ता काबीज करण्यासाठी ही खेळी खेळण्यात आल्याचे बोलले जात आहे.
वृत्त...४
कांजुर आगीबाबत
अहवालाची प्रतीक्षाच
मुंबई : कांजुरमार्ग स्थानक परिसरातील रिले कक्षाला २६ ऑक्टोबरला आग लागली होती. यामुळे २४ सिग्नल यंत्रणा बंद झाल्याने नऊ तासांहून अधिक वेळ लोकल वाहतूक रखडली होती. या दुर्घटनेला सात दिवस उलटूनही आग कशामुळे लागली, याचा शोध रेल्वे प्रशासनाला लागलेला नाही. आगीच्या घटनेनंतर नेमण्यात आलेल्या तीन सदस्यीय समितीने सात दिवसांची मुदत उलटूनही अद्याप अहवाल सादर केलेला नाही. वृत्त...५
चेंबूर बस दुर्घटना
विविध घटकांमुळे
मुंबई : चेंबूर येथे शालेय बसवर झाड कोसळण्याच्या ३० जूनला घडलेल्या दुर्घटनेला एकच गोष्ट जबाबदार नव्हती, असा निष्कर्ष या घटनेची फेरचौकशी करणाऱ्या एकसदस्यीय समितीने काढला आहे. ‘दुर्घटना घडली तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी होती. तिथे वाहने नसती, तर शालेय बस अधिक वेगाने पुढे निघून गेली असती’, असेही समितीने म्हटले आहे. वृत्त...५
ध्वनिप्रदूषणावरून
न्यायालयाचे खडे बोल
मुंबई : ‘ध्वनिप्रदूषणाचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होतो. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांनी मुंबईत यासंबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होत आहे की नाही, याची खात्री करावी. हे काही उपकार नाहीत, तर त्यांचे कर्तव्यच आहे’, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने बुधवारी महापालिकेला सुनावले. बांधकाम ठिकाणच्या आवाजाचा नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही न्यायालयाने यावेळी दिले. वृत्त...४