Guwahatis Main Accused Killed In Encounter Updates On Shooting Incident And Emergency Situations
प्रमुख आरोपी चकमकीत ठार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
गुवाहाटी : गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील प्रमुख आरोपी आसामच्या शिवसागर जिल्ह्यात बुधवारी पहाटे पोलिस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिस चकमकीत ठार झाला.
हॉटेलातील गोळीबाराच्या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता. यातील आरोपी घनकांत गोगोई (वय ३४) याला दुसऱ्या एका प्रकरणाच्या संदर्भात आरोपी शिवसागर येथे नेण्यात येत होते. यादरम्यान पहाटे ३.१० वाजताच्या सुमारास गौरीसागर येथे ही चकमक झाली.हॉटेल गोळीबार प्रकरणी सात दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर गुवाहाटी येथील एका न्यायालयाने घनकांत याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर काही तासांनी मंगळवारी शिवसागर पोलिसांनी त्याला २०२४च्या एका बँक फसवणूक प्रकरणात अटक केली होती.