भारतीय जहाजांना ‘होर्मुझ’मुभा

Contributed by: दुबई,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
indian ships granted exemption from transit restrictions in hormuz
भारतासह चार देशांच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना इराणने वाहतूक निर्बंधांतून सूट दिली आहे. या सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या सागरी मार्गातून जाणाऱ्या जहाजांवर सातत्याने हल्ले होत असताना ही घोषणा करण्यात आली.

इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समितीचे उपाध्यक्ष अमीर हयात मोघद्दम यांनी ‘इराणी स्टुडंट्स न्यूज एजन्सी’ला मंगळवारी दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. ‘सध्या भारत, चीन, इराक आणि कतार या चार देशांना होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक निर्बंधांतून सूट देण्यात (पान ६वर)