या प्रश्नातून मी छोटासा निर्णय घेतला. आठवड्यातून किमान एक-दोन दिवस मोबाइलचा अनावश्यक वापर टाळायचा आणि कुटुंबीयांसोबत मनमोकळ्या गप्पा मारायच्या. एकमेकांच्या सुख-दुःखाची विचारपूस करायची, जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा आणि एकत्र वेळ घालवायचा. या निर्णयामुळे मला एका महत्त्वाच्या गोष्टीची जाणीव झाली. आनंद मिळवण्यासाठी नेहमी मोठ्या गोष्टींची आवश्यकता नसते. आपल्या माणसांसोबत बसून केलेल्या साध्या गप्पा, एकत्र घेतलेला चहा, जेवताना झालेली थट्टा-मस्करी आणि आपुलकीनं विचारलेली ख्यालीखुशाली यांतही किती मोठा आनंद दडलेला असतो!एखाद्याला साधं ‘कसे आहात?’ असं प्रेमानं विचारणं, त्याचं बोलणं शांतपणे ऐकणं किंवा अडचणीच्या वेळी त्याच्या पाठीशी उभं राहणं, यासाठी कोणत्याही तंत्रज्ञानाची गरज नसते. गरज असते ती फक्त वेळेची आणि आपुलकीची. म्हणूनच कुटुंबात जेवताना मोबाइल बाजूला ठेवणं, मित्रांना प्रत्यक्ष भेटणं आणि ज्येष्ठांशी गप्पा मारणं अशा छोट्या सवयी आपण जाणीवपूर्वक लावून घेतल्या, तर हरवत चाललेला संवाद पुन्हा आपल्या जीवनात फुलू शकेल. मोबाइल वापरणं चुकीचे नाही; प्रश्न आहे तो त्याच्या वापराच्या मर्यादेचा. त्याच्या हव्यासात कुटुंबासाठी वेळ राखून ठेवणे गरजेचे आहे. हरवलेला हा संवाद पुन्हा मिळवणं, हीच माझ्यासाठी मोठी कमाई आहे.