भारताचा तारांकित क्रिकेटपटू असलेल्या विराट कोहलीच्या शिरपेचात बुधवारी विक्रमाचा आणखी एक तुरा खोवला गेला. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १३ हजार धावांचा टप्पा गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
ईडन पार्कवर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात भारताच्या या माजी कर्णधाराने हा विक्रम केला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याच्या नावावर आता १३,०६२ धावा झाल्या असून ही कामगिरी त्याने ६१.६१च्या सरासरीने केली आहे.याआधी एखाद्या विशिष्ट क्रमांकावर फलंदाजी करताना १३ हजार धावांचा पल्ला पार करण्याची कामगिरी भारताच्याच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी केली होती.