Patil And Siddiqis Appointments A Storm In The Party
पाटील, सिद्दिकी यांच्या नियुक्त्या वादात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी पुन्हा एकदा नुकत्याच घेण्यात आलेल्या निर्णयाविषयी चर्चा झाली. पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते म्हणून उमेश पाटील आणि मुंबई अध्यक्ष झिशान सिद्दिकी यांची नियुक्ती विचाराअंती झाली असून, त्यांना किमान सहा महिने काम करण्याची संधी द्यावी, दोघांचे काम समाधानकारक नसेल तर त्यांना बदलण्यात येईल, असा विश्वास यावेळी पार्थ यांनी दिला. मात्र, पाटील, सिद्दिकी यांच्या नियुक्तीमुळे पक्षात कमालीची नाराजी असून त्यावर निर्णय घेण्याची गरज नेत्यांनी व्यक्त केली. त्याकडे पार्थ यांनी काणाडोळा केल्याचे कळते. बैठकीत सुनेत्रा पवार यांनी मौन बाळगणे पसंत केले.