विवेक रामास्वामी यांचा पराभव

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
vivek ramaswamys historic defeat in ohio
विवेक रामास्वामी यांचा पराभव

भारतीय वंशाचे रिपब्लिकन नेते विवेक रामास्वामी यांचा पराभव धक्कादायक समजला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक असलेल्या रामास्वामी ओहायोच्या गव्हर्नरपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, डेमोक्रॅट उमेदवार एमी ॲक्टन यांनी त्यांचा पराभव केला. ओहायो हा रिपब्लिकनांचा मजबूत गड समजला जात असताना तिथेच डेमोक्रॅट्सनी त्यांना धूळ चारली. ॲक्टन या ओहायोच्या पहिल्या महिला गव्हर्नर ठरणार आहेत.