आसामात अपघात; २६ ठार, २० जखमी

Contributed by: काझीरंगा (आसाम),वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
horrific accident in assam 26 dead 20 injured
आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ शुक्रवारी एक मिनीबस आणि कंटेनर ट्रक यांची समोरासमोर टक्कर होऊन २६ जणांचा मृत्यू ओढवला, तर २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

ही मिनीबस जोरहाटहून नागावकडे जात होती, तर कंटेनर ट्रक अप्पर आसामकडे जात होता. हातीकुली चहा मळ्याजवळील रंगाजन येथे राष्ट्रीय महामार्ग ७१५ वर ही मिनीबस ट्रकला जोरात धडकली. अपघातातील जखमींना कोहोरा मॉडेल रुग्णालयामध्ये नेण्यात आले. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अपघातातील जखमींपैकी अनेक जण कॉलेजचे विद्यार्थी होते. आपले वर्ग संपवून ते परत येत असताना हा अपघात झाला. मात्र बसमध्ये नेमके किती प्रवासी होते ते समजू शकले नाही. बसमध्ये ३५हून अधिक विद्यार्थी असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.