पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील आरोपांचे पुरावे आपल्या फोनमध्ये असून, तो फोन पंतप्रधानांकडून टॅप केला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.
इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी’ सत्रात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल म्हणाले, की भाजप संसदेत चर्चा करण्याचे सांगते; मात्र त्यांना सभागृहात बोलू दिले जात नाही आणि त्यांचा मायक्रोफोनही बंद केला जातो. ‘कृषी विधेयके, मतचोरी, एसआयआर, चीन, जनरल नरवणे यांचे पुस्तक आणि एपस्टीन या मुद्द्यांवर मला बोलू दिले नाही. मला लांबलचक भाषणांची नव्हे, तर एकास एक चर्चा हवी आहे,’ असे ते म्हणाले.मुंबई : राहुल गांधी यांना ‘मोदी फोबिया’ झाला आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली. प्रसिद्धीसाठी गांधी निराधार आणि बालिश आरोप करत असल्याचे शिंदे यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले. ठोस मुद्दा, विकासाचे व्हिजन किंवा पुरावे नसताना गांधी रोज नवे खोटे कथन रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला. विरोधी पक्षनेते हास्यास्पद विधानांनी स्वतःचेच हसे करून घेत आहेत, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.