अमेरिकेत दोन विमानांची धडक

Contributed by: मियामी,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
collision of two planes at miami airport two injured
अमेरिकेतील मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोपा विमान कंपनीचे एक प्रवासी विमान रनवेहून टर्मिनलपर्यंत जाताना यूपीएसच्या मालवाहू विमानाला धडकले. यामध्ये दोन जण जखमी झाले, असे वृत्त अमेरिकी प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

ही घटना शनिवारी स्थानिक वेळेनुसार रात्री ९:१५च्या सुमारास घडली. हवाई वाहतूक नियंत्रकांनी यूपीएसच्या कर्मचाऱ्यांना कोपा विमानाला मार्ग देण्याचे निर्देश दिले होते. या अपघाताची चौकशी सुरू आहे, असे ‘एफएए’ने सांगितले. दरम्यान, कोपा विमान कंपनीने त्रासाबद्दल खेद व्यक्त केला.