कळवण प्रकल्प राज्यात अव्वल

Contributed by: कळवण,म. टा. वृत्तसेवा|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
कळवण प्रकल्प राज्यात अव्वल
आदिवासी विकास विभागाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल, गडचिरोली येथे आयोजित ‘भगवान बिरसा मुंडा कला संगम २.०’ या राज्यस्तरीय स्पर्धेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवणच्या कलाकारांनी उल्लेखनीय यश संपादन केले. वाद्य वादन (पावरी नृत्य) आणि पोस्टर डिझाइन या दोन्ही स्पर्धांमध्ये कळवण प्रकल्पाच्या कलाकारांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.

पोस्टर डिझाइन स्पर्धेत सुरेश भास्कर पवार, कलाशिक्षक, कन्या आश्रमशाळा माणी, ता. सुरगाणा यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर वाद्य वादन स्पर्धेत कळवण तालुक्यातील मळगाव येथील सोमनाथ काळू पवार, राजेंद्र शिवाजी महाले व पंडित लक्ष्मण राऊत यांच्या कलापथकाने पारंपरिक पावरी नृत्य सादर करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.
या यशस्वी कलाकारांच्या गौरव सोहळ्याची माहिती कार्यकर्त्यांनी माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार यांना दिल्यानंतर त्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून कलाकारांचा सन्मान केला. मळगाव येथील पावरी नृत्य कलापथकाला जयश्री पवार यांच्यावतीने शाल, श्रीफळ व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.