‘खासदार क्रीडासंग्राम’चे आज उद्घाटन

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,ठाणे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Maharashtra Times
ठाणे जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘खासदार क्रीडासंग्राम सीझन २’ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता डोंबिवलीतील संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलात होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित या महोत्सवात ७५ हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. ३१ खेळ आणि ३२ क्रीडास्थळांवर होणारा हा क्रीडासंग्राम ठाणे जिल्ह्याचे ‘मिनी ऑलिम्पिक’ ठरणार आहे. कल्याण, ठाणे आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघांतील खेळाडू यात सहभागी होणार आहेत. या उपक्रमातून युवा आणि स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. २९ नोव्हेंबर रोजी केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत या महोत्सवाची सांगता होणार आहे.