नोकरी-व्यवसायाच्या धावपळीत घरातील वृद्ध आई-वडिलांकडे दुर्लक्ष होऊ नये, याची जाणीव ‘केअरटेकर’ या नाटकातून करून देण्यात आली.
६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत गुरुवारी (दि. १९) सुरंजन बहुद्देशीय संस्थेच्या वतीने परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा प्रयोग सादर झाला. लेखन व दिग्दर्शन आशा भोईर-बांडे यांचे होते. सुचित्रा व विशाल यांचा प्रेमविवाह झालेला असतो. विशालचे वृद्ध वडील अर्धांगवायूमुळे आजारी असतात. मात्र, सुचित्रा व विशाल नोकरी करीत असल्याने त्यांना त्यांच्याकडे पाहायला वेळ नसतो. त्यामुळे त्यांच्यासाठी केअरटेकर ठेवला जातो. त्यातून पित्याची घुसमट होते, असे नाटकाचे कथानक होते. योगेश साळवे, ऋषी गायकर, भूषण गोडबोले, सरिता परदेशी, अमोल कारभारी, श्लोक आल्हाट व आशा भोईर यांच्या भूमिका होत्या. संगीत पार्थ देवकर यांचे, प्रकाशयोजना जयप्रकाश पुरोहित यांची, तर वेशभूषा उषा देवकर यांची होती.आजचे नाटक : खेळ (नाट्यभारती, इंदूर)
राज्य नाट्य स्पर्धा
परशुराम साईखेडकर नाट्यगृहातील ध्वनियंत्रणा सदोष असल्याने नाटकांतील पात्रांचे आवाज नीट ऐकू येत नसल्याने रसिकांचा हिरमोड होत होता. त्यात गुरुवारी (दि. १९) सुधारणा करण्यात आल्याचे रसिकांकडून सांगण्यात आले.