सीसीटीव्ही,ओएफसी नेटवर्कचे मूल्यांकन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Maharashtra Times
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून चार हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत. सोबतच ओएफसी नेटवर्क, बॅकहॉल कनेक्टिव्हिटीचीही कामे सुरू आहेत. कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यात लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने एकात्मिक नियोजन आणि तांत्रिक पायाभूत सुविधा वेळेत उभारणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कामांचे तांत्रिक मूल्यांकनही केले जाणार असून त्यासाठी सदरची बैठक बोलविण्यात आली आहे.