- विक्रमादित्य न. पणशीकर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
राशिभविष्य
मेष : चंद्रकृपेने व्यवसायातील नियोजित कामे यशस्वी होतील. विरोधकांवर अंकुश ठेवाल.वृषभ : सुसंवादाने कामे मार्गी लावा. प्रियजनांच्या गरजांचा आलेख उंचावेल.
मिथुन : नोकरदारांना श्रेयासाठी लढावे लागेल. तुलनात्मक चिकित्सा करून कामास न्याय द्या.
कर्क : नव्या योजना यशस्वी होतील. आर्थिक व्यवहारात प्रियजनांचा सल्ला आवश्यक ठरेल.
सिंह : अविश्रांत कार्य पद्धतीचे कौतुक होईल. आर्थिक व्यवहारात बाजी माराल.
कन्या : कार्यक्षेत्रात नव्या संधीची सत्यता तपासा. व्यवहारातील स्वतःचे कौशल्य सिद्ध करा.
तुळ : नोकरीधंद्यातील सहकारीवर्ग नाराज प्रकट करतील. कलाकारांना प्रतिकुल अनुभव येईल.
वृश्चिक : विरोधकांवर मात करणे शक्य होईल. नोकरीधंद्यात स्थिरता जाणवेल.
धनु : मनावरील ताण दूर करण्यास प्राधान्य द्यावे. प्रियजनांच्या कलाने घ्यावे लागेल.
मकर : कार्यक्षेत्रात धावपळ दगदग करुन यश संपादन होईल. मान्यवरांचा सल्ला उपकारक ठरेल.
कुंभ : आर्थिक व्यवहारात लाभ होईल. कार्यक्षेत्रात स्वमतास प्राधान्य द्यावे.
मीन : नोकरीधंद्यात सहकारीवर्गाची साथ लाभेल. पैशाचे महत्त्व ओळखून व्यवहार करा.