२२ जखमी प्रवाशांना घाटीतून सोडले

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
horrific accident for passengers 22 injured reach home
पुण्याहून नागपूरकडे जाणाऱी खासगी लक्झरी बस केंब्रिज चौकात उलटून शनिवारी झालेल्या अपघातात जखमी झालेल्या २२ जणांवर घाटीत उपचार करून रविवारी घरी सोडण्यात आले, अशी माहिती देण्यात आली.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने उड्डाणपुलाचा संरक्षक कठडा तोडून बस थेट पुलाखाली कोसळली. यात बस अटेंडंटचा मृत्यू होऊन, २५ जखमी प्रवाशांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी रात्री जखमींची विचारपूस केली.
‘२२ प्रवाशांवर घाटीत उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली. तर, तीन रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत. तिन्ही रुग्णांची प्रकृती सुधारत आहे,’ असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी सांगितले.