‘द अर्थशॉट प्राइझ अवॉर्ड्स’ सोहळा १७ नोव्हेंबरला होणार असून, २०२६मधील पाच विजेत्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. यंदा १५ अंतिम स्पर्धकांमधून निसर्गाचे संरक्षण व पुनरुज्जीवन, हवा प्रदूषणमुक्त करणे, महासागरांचे पुनरुज्जीवन, कचरामुक्त जग आणि हवामान बदलावर उपाययोजना या पाच श्रेणींमध्ये प्रत्येकी एक विजेता निवडला जाणार आहे. भारताकडून महिला हाउसिंग ट्रस्टबरोबरच महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटीच्या सुमन मिश्रा यांचाही अंतिम स्पर्धकांमध्ये समावेश आहे. मदर अर्थ फाउंडेशन, साउथ कोरियाज झीरो वेस्ट मूव्हमेंट नेटवर्क, पी-फॅस फ्री फ्रान्स, एअर क्यूओ, पुला, अर्स्टेड, द इंडिजिनस डेजर्ट अलायन्स, यलोस्टोन टू युकोन, भूतान, बार्सिलोना शहर, झेंबा आणि न्यूवे ओशन वाइड ट्रस्ट यांचे प्रकल्पही स्पर्धेत आहेत.