Tragic Deaths Of Workers Buried Under Debris Horrific Accident In Well Digging In Pandharpur
ढिगाऱ्याखाली दबून
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
ढिगाऱ्याखाली दबून
चार कामगारांचा मृत्यू सोलापूर : आंबे (ता. पंढरपूर) गावात शेतामध्ये विहीर खोदण्याचे काम सुरू असताना माती आणि दगडांचा मोठा भराव कोसळून चार कामगारांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली. मंगेश मोरे (३५) आणि सिद्धेश्वर घाडगे (४५), आबासाहेब घोडके (५०) आणि तानाजी घोडके (५४) अशी मृतांची नावे आहेत.
ललित मोदी याला ब्रिटनचे नागरिकत्व
लंडन : आपल्याला नुकतेच ब्रिटनचे नागरिकत्व मिळाल्याची घोषणा इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) संस्थापक ललित मोदी याने शनिवारी सोशल मीडियावर केली. ‘मी ब्रिटिश नागरिक असल्याचा मला अभिमान आहे’, असे त्याने म्हटले आहे.
वृत्त...१०
देवदेवता भेदभाव करत नाहीत : मुख्यमंत्री
मुंबई : ‘देवदेवता कोणताही भेदभाव करत नाहीत. जात, प्रांत, भाषा किंवा आर्थिक परिस्थितीचा विचार न करता भक्तिभावाने ओंजळभर पाण्याचे अर्घ्य अर्पण केले, तरी छठीमैया, सूर्यनारायणाचा आशीर्वाद लाभतो’, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.वृत्त...५
विल्यम-केट यांचा मुंबई दौरा आजपासून
मुंबई : ब्रिटनचे प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस केट मिडलटन आज, सोमवारपासून मुंबई दौऱ्यावर आहेत. या तीन दिवसीय दौऱ्यात प्रिन्स विल्यम गल्ली क्रिकेटच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. प्रिन्सेस केट एका रुग्णालयाला भेट देणार आहेत.
वृत्त...३
रेल्वे स्थानकांवर ‘प्रीपेड’ टॅक्सी सेवा
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील सहा प्रमुख स्थानकांवर प्रीपेड टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, विरार आणि पालघर या स्थानकांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे.वृत्त...२