दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
young man dies in motorcycle accident demand for action against tractor driver
छत्रपती संभाजीनगर : शरणापूर-दौलताबाद रस्त्यावर देता रस्त्याच्या मधोमध उभ्या केलेल्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकली. या धडकेत दुचाकीस्वार एका तरुणाचा मृत्यू झाला. दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास शेळके मामा ढाब्याजवळ घडली.

या प्रकरणात दर्गा रोड परिसरातील ४१ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रॅक्टरचालकाने कोणताही इशारा न देता निष्काळजीपणे ट्रॅक्टर रस्त्याच्या मधोमध उभा केला होता. त्याच वेळी पाठीमागून येणारी दुचाकी ट्रॅक्टरवर जाऊन धडकली. या अपघातात महिलेचा मुलगा संदीप दांगोडे आणि त्याचा मित्र अतिक खान गंभीर जखमी झाले. संदीप आणि अतिक खान याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान संदीपचा मृत्यू झाला. या प्रकरणात ट्रॅक्टरचालकाच्या विरोधात दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.