राज्याभिषेक समारोह संस्था, ठाणे यांच्या वतीने यंदाही ‘ दुर्गबांधणी स्पर्धा नव्हे, प्रोत्साहन २०२६’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे १५वे वर्ष असून, १००हून अधिक जणांनी नोंदणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण व्हावे, गड-किल्ल्यांच्या स्थापत्यशास्त्राची माहिती नव्या पिढीला व्हावी आणि मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच निवडक विजेत्यांना विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे.सहभागासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी करताना बांधलेल्या दुर्गाचे चारही बाजूंनी काढलेले चार फोटो आणि संपूर्ण दुर्ग दिसेल असे वरून काढलेले एक छायाचित्र, अशी एकूण पाच छायाचित्रे अपलोड करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी २१ नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : शंतनू खेडकर यांच्याशी ८९७६१४२२२६ किंवा ९३२१९९२९०२