मेट्रो स्थानकाचा चुकीचा फलक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मेट्रो स्थानकाचा चुकीचा फलक
वाकड-नाशिक फाटा मार्गावर मेट्रो स्थानकाची दिशा दर्शविणारे चुकीचे फलक सुधारण्याबाबत मेट्रो प्रशासनाची अनास्था प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पिंपरी महापालिका ते स्वारगेट मार्गावर धावणाऱ्या नाशिक फाटा मेट्रो स्थानकाच्या नावात वर्षभरापूर्वीच भोसरीऐवजी नाशिक फाटा असे नामकरण करण्यात आले. मात्र, जे. आर. डी. टाटा उड्डाणपुलाच्या सुरुवातीला पुलावरून कासारवाडी रेल्वे स्थानकाकडे जाताना वळणावर आणि शंकर मंदिर येथे अद्याप भोसरी मेट्रोस्थानक हे फलक आहेत. त्यामुळे शहरात नव्याने येणाऱ्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

- नितिन कुंभार
मेट्रो स्थानकाचा चुकीचा फलक