बेरोजगारीचा दर घटून ४.९ टक्क्यांवर

Contributed by: वृत्तसंस्था,नवी दिल्ली|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
economic improvement unemployment stabilizes at 49
महिलांचा रोजगारातील वाढता सहभाग वाढल्याने देशातील बेरोजगारीचा दर सप्टेंबरमधील पाच टक्क्यांवरून ऑक्टोबरमध्ये किंचित घटून ४.९ टक्क्यांवर आला आहे. ग्रामीण भागात ही सुधारणा विशेषतः दिसून आली, अशी माहिती केंद्र सरकारने सोमवारी प्रसिद्ध केली.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आवर्ती कामगारशक्ती पाहणीच्या (पीएलएफएस) बुलेटिननुसार, १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांचा एकूण बेरोजगारीचा दर ऑक्टोबर २०२५ मधील ५.२ टक्क्यांच्या तुलनेत ०.३ टक्क्यांनी कमी झाला आहे.
शहरी बेरोजगारीचा दर सप्टेंबरच्या ६.९ टक्क्यांवरून ऑक्टोबरमध्ये ६.७ टक्क्यांवर आला आणि ग्रामीण बेरोजगारीचा दर ४.२ टक्क्यांवर स्थिर राहिला. महिलांचा कामगारशक्ती सहभाग दरही (एलएफपीआर) वाढला आहे. सप्टेंबरमधील ३४.६ टक्क्यांवरून ऑक्टोबरमध्ये ३५ टक्क्यांवर पोहोचला.