‘आयआयटी, दिल्ली’ अव्वल २०० संस्थांमध्ये

Contributed by: वृत्तसंस्था,नवी दिल्ली|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘आयआयटी, दिल्ली’ अव्वल २०० संस्थांमध्ये
‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी सस्टेनेबिलिटी रँकिंग्ज २०२७’नुसार, दिल्लीची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( आयआयटी, दिल्ली ) जागतिक स्तरावर १९४व्या क्रमांकासह ‘टॉप २००’मध्ये पोहोचली आहे. त्यानंतर आयआयटी-खरगपूर २२४व्या आणि दिल्ली विद्यापीठ २३७व्या स्थानावर आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (जेएनयू) २०२३ नंतर प्रथमच पुन्हा टॉप ५००मध्ये स्थान मिळवले.