Increasing Incidence Of Eye Irritation And Skin Allergies
डोळ्यांची जळजळ, त्वचेची ॲलर्जी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
डोळ्यांची जळजळ , त्वचेची ॲलर्जी वाढत्या प्रदूषणाचा परिणाम डोळे आणि त्वचेवरही होत आहे. डोळ्यांतून सतत पाणी येणे, कोरडेपणा, खाज आणि लालसरपणा अशा तक्रारी वाढल्या आहेत. दिवाळीत फटाके फोडताना झालेल्या जखमांमुळेही काही लहान मुलांना त्रास होत असल्याचे दिसते. याशिवाय दिवाळीत मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन वाढल्याने पोटदुखी, पोट बिघडणे, मळमळ आणि उलट्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. बाहेर पडताना मास्क वापरणे, गर्दीची ठिकाणे टाळणे, डोळ्यांना त्रास झाल्यास स्वच्छ पाण्याने धुणे आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांत कोणतेही औषधी थेंब टाकू नयेत, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.