वाकडेवाडी बसस्थानकात अकोल्याला जाण्यासाठी बसमध्ये बसलेल्या महिलेच्या सूटकेसमधून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, एक लाख ५७ हजार रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. बस बदलण्याच्या गडबडीत गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी हा ऐवज लंपास केला. या प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत कमल दत्ता आठवे (वय ६२, रा. इंदेवाडी, पाण्याच्या टाकीजवळ, जि. जालना) यांनी तक्रार दिली आहे. आठवे पतीसह अकोल्याला जाण्यासाठी वाकडेवाडी बसस्थानकात आल्या होत्या. अचानक बस बदलल्याने दोघे खाली उतरत असताना त्यांनी सूटकेस तपासली असता, त्यातील सोन्याचे दागिने, एक लाख ५७ हजार रुपयांची रोकड आणि कागदपत्रे नसल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर आठवे यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.