‘वाटा समृद्ध आरोग्याच्या’ २१, २२ नोव्हेंबर रोजी

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,पुणे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
paths to prosperous health special program for diabetes day
स्वास्थ्यसंपदा हेल्थ सर्व्हिसेसतर्फे जागतिक मधुमेह दिनानिमित्त २१ व २२ नोव्हेंबर रोजी ‘वाटा समृद्ध आरोग्याच्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

टिळक आयुर्वेद महाविद्यालय आणि ‘आयआरएसएचए, भारती विद्यापीठ’ यांच्या सहयोगाने आयोजित हा कार्यक्रम दोन्ही दिवशी दुपारी चार ते आठ या वेळेत तळजाई हिल टॉप, प्लॉट २०, (सदू शिंदे स्टेडियम प्रवेशद्वाराशेजारी) होतील, अशी माहिती ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ आणि स्वास्थ्यसंपदा हेल्थ सर्व्हिसेसच्या संचालक, डॉ. ज्योती शिरोडकर आणि कार्यकारी संचालक, अजय शिरोडकर यांनी दिली.
यात पहिल्या दिवशी विशिष्ट मैदानी खेळांच्या प्रात्यक्षिकांविषयी डॉ. नितीन हांडे यांच्याशी संवाद, ‘डायबेटिससाठी आयुर्वेद नक्की केव्हा? आणि कशासाठी?’ यावर डॉ. ज्योती शिरोडकर, डॉ. सुप्रिया भालेराव यांचे मार्गदर्शन होईल. २२ नोव्हेंबर रोजीच्या वडील आणि मुलगा/मुलगी यांच्या सहभागावर आधारित प्रश्नमंजूषा होईल. यानंतर ‘काय व कसे खावे यावर आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शन, ‘जीवनशैली आणि स्त्री आरोग्य’ याविषयी डॉ. प्रज्ञा आपटीकर यांच्याशी संवाद, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. चित्तरंजन याज्ञिक यांची मुलाखत होईल. https://shorturl.at/LQPtX या लिंकवरून पूर्वनावनोंदणी बंधनकारक आहे.