Punyabhushan Award An Important Contribution To Societys Development
पुण्यभूषण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
संपादक : नीलिमा जोशी वाडेकर,
पाने : ३१२, किंमत : ४०० रुपयेपुण्यभूषण
पुण्यात नसतो, तर अजय-अतुल म्हणून घडलोच नसतो (अजय-अतुल गोगावले), जुनं पुणं : एक समृद्ध अडगळ? (अविनाश सोवनी), साधू वासवानी मिशन (राजीव साबडे), पुणेकर व्यंगचित्रं (अभिमन्यू कुलकर्णी), अत्रे आणि पुलंच्या नजरेतून पुणं (दिलीप कुंभोजकर), पुणे-एक साठवण (प्रभाकर बोकील) आदी लेख आहेत.
संपादक : डॉ. सतीश देसाई, पाने : २१६, किंमत : ३०० रुपये
जत्रा
जगदीश कुलकर्णी यांची खट्याळ खिडकी चित्रे हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. विडी ओढक्यांचं संमेलन (अशोक मानकर), लेखक आणि घोडा (अविनाश चिंचवडकर), रस्ते तप्पीहोईतु (सुनील भांतब्रेकर), प्रवीणचं प्रेमप्रकरण (मिलिंद कुलकर्णी), उतारवाडीची ब्यूटी कॉन्टेस्ट (श्रीनिवास शारंगपाणी), आमचा चड्डीतून पँटीकडे प्रवास (डॉ. रवींद्र तांबोळी) आदींचे लेख आहेत.
संपादक : अभय कुलकर्णी, पाने : १८६, किंमत : ३५० रुपये
उत्कर्ष
‘आम्ही जेन झी’, कथास्पर्धा विभाग अंकात आहेत. कविता कृष्णमूर्ती यांची मुलाखत, माझा आतला लेखक आणि त्याचा आवाज (योगेश सोमण), नाथ हा माझा (डॉ. राधा मंगेशकर), शेतातलं शवागार (श्रीनिवास शारंगपाणी), पु. ल. पत्रांची कहाणी (विजय कुवळेकर) आदींचे लेख वाचनीय आहेत.
संपादक : नीलिमा जोशी वाडेकर,
पाने : ३१२, किंमत : ४०० रुपये
ऊंसमळा
ललित लेख, कथा, कविता, प्रवासवर्णन आदी विभाग अंकात आहेत. समृद्ध शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (प्रकाश शहा), मातीपासून चुलीपर्यंत अटलांटाच्या अंगणात (सुनील देशपांडे), विषमुक्त ताट आणि डोलणारं रान (आशिष विधाते), वाटण गेरा : एका चविष्ट रानभाजीची गोष्ट (प्राची क्षीरसागर) आदींचे लेख आहेत.
संपादक : भाग्यश्री देशपांडे, पाने : ७८, किंमत : ९० रुपये
शिक्षणहक्क पत्रिका
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी : चिकित्सा या विषयावर हा दिवाळी अंक आहे. डॉ. शैलजा बरुरे, रमेश भा. पाटील, डॉ. डी. एन. मोरे, प्रा. रमेश सोनवळकर, प्रा. डॉ. बिजयसिंग भाबरदोडे, डॉ. क्रांती मोरे, प्रा. डॉ. श्यामराव लेंडवे आदींचे लेख यात आहेत.
संपादक : प्रा. शरद जावडेकर,
पाने : १२४, किंमत २०० रुपये
छावा
गोष्टी, लेख, कविता असे विभाग अंकात आहेत. मुंग्यांची फौज (उज्ज्वला केळकर), वेगळ्या दुनियेत (शुभदा साने), आहार विज्ञान (रजनी हिरळीकर), धुनी (कविता मेहेंदळे), महान भारतीय गणिती-श्रीनिवास रामानुजन (प्रणाली काळे) आदींचे लेख आहेत.
संपादक : डॉ. गीताली टिळक, पाने ११२, किंमत : १२५ रुपये
मीडिया वॉच
जेन-झीबाबत विशेष लेख, महाराष्ट्र धर्म : मराठी असण्याची जाणीव (प्रा. दीपक पवार), लीळाचरित्राची गोष्ट (इंद्रजित भालेराव), एका विलक्षण वळणावर उभा असलेला नेपाळ (मुक्ता चैतन्य), कहाणी पाब्लो एस्काबोर नावाच्या बदनाम वादळाची (समीर गायकवाड) यांचे लेख आहेत. अंकात कवितांचा विभागही आहे.
संपादक : अविनाश दुधे, पाने : १९४, किंमत : ३०० रुपये
समाजमन
प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांच्यावरील विभाग या अंकाचे वैशिष्ट्य आहे. या विभागात सोनाली कुलकर्णी, उत्तमकुमार इंदोरे, मंगेश कुलकर्णी, विश्वजित शिंदे, डॉ. आदित्य केळकर, प्रभाकर खोले यांचे लेख आहेत. खेळाच्या मैदानातून उद्योजकतेपर्यंत (नेहा कोर्टीकर), पीआर क्षेत्र (तुषार जोशी) आदींचे लेख आहेत.
संपादक : वंदना कोर्टीकर, पाने : ११४, किंमत २५० रुपये
निर्मळ रानवारा
गोष्टी, कविता, संवाद, रंगवण्यासाठी चित्र, शब्दखेळ, चित्रकथा यामुळे अंक बालकांसाठी खास आहे. कंटाळा सम्राट, रागिनी आणि अदृश्य दरवाजा, दिवे घ्या दिवे, उद्याचं ओझं, कंदील या गोष्टी चांगल्या आहेत. राजूची भेळ, एक छोटीशी पणती, चला शोधू कावळे या गोष्टी वाचनीय आहेत. मांजराच्या गळ्यात घंटा ही चित्रकथा बच्चे कंपनीचा मनोरंजन करणारी आहे. आश्लेषा महाजन यांची कंटाळपुराण, डॉ. सुरेश सावंत यांची झोपाळू कुंभकर्ण, शंकर विटणकर यांची आमची आजी, विद्या साताळकर यांची स्वप्नातली शाळा, दीपा पराडकर यांची नवे काही करू या, हेमलता महाजन यांची फराळाची शाळा या कविता मुलांना गुंतवून ठेवणाऱ्या आहेत.
संपादक : सुप्रिया कुलकर्णी, पाने : १५०, किंमत : ४० रुपये
स्वान्त:सुखाय
डॉ. यशवंत थोरात यांची यश : शिखरावर पोहोचणे की माणूस होणे आणि देवकी पंडित यांची स्वरांच्या शोधात : माझ्या गुरू किशोरीताई या कथा वाचनीय आहेत. अहिल्यानगर येथील देवव्रत रेखे यांच्यावरील जेन-झी वेगळा चेहरा हा वेगळ्या धाटणीचा लेख, उस्ताद अमजद अली खाँ यांच्यावरील शंकर पांडे यांनी लिहिलेला लेखही वाचनीय आहे.