सिल्लोड तालुक्यातील लोणवाडी आणि देऊळगाव बाजार येथे शेतकरी आत्महत्येच्या दोन दुर्दैवी घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांनी दोन्ही गावांना भेट देऊन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचे सांत्वन केले. कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना धीर दिला.
लोणवाडी येथील शेतकरी गोविंदा बंडू सुलताने यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर अब्दुल सत्तार यांनी सुलताने कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कुटुंबावर ओढवलेल्या संकटाबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला.देऊळगाव बाजार येथील शेतकरी त्र्यंबक पंडित (वय ६२) यांनी सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि दुष्काळी परिस्थितीमुळे आत्महत्या केली होती. सत्तार यांनी पंडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व या कठीण प्रसंगी कुटुंबीयांना धीर दिला.