Severe Fire At Furniture Warehouse In Sangli No Loss Of Life
फर्निचर गोदामाला सांगलीत आग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
सांगली : सांगलीतील टिंबर एरियातील फर्निचरच्या गोदामाला सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने गोदामातील फर्निचर साहित्याने पेट घेतला. सुदैवाने जीवितहानी नाही.
आगीची ज्वाला शेजारील कुमार ट्रेड सेंटर या तीन मजली इमारतीपर्यंत पोहोचल्याने आणि टिंबर एरिया हा संपूर्ण लाकडांचा साठा असलेला भाग असल्याने धोका निर्माण झाला होता; परंतु महापालिकेच्या अग्निशमन दलाने नऊ गाड्यांच्या माध्यमातून पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली.