Two Burglarys In Shivajinagar Stolen Valuables Worth 276 Lakhs
शिवाजीनगरमध्ये दोन घरफोड्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पुणे : शिवाजीनगर गावठाण आणि मॉडेल कॉलनी परिसरात चोरट्यांनी दोन घरे फोडून दोन लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
चोरट्यांनी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी शिवाजीनगर गावठाणातील मिसाळ चेंबर्स सोसायटीतील कुटुंबाच्या सदनिकेच्या दरवाजाची कडी तोडून कपाटातून दोन लाख २० हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुसऱ्या घटनेत मॉडेल कॉलनीतील बंगल्याच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, जुने घड्याळ आणि मोबाइल असा ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.