गर्दुल्ल्यांच्या अड्ड्यांमध्ये रूपांतर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Maharashtra Times
सुरक्षा व्यवस्थेअभावी या चौक्यांवर अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्यांनी आपले बस्तान बसवले असून, काही ठिकाणी त्यांचे मद्यपी आणि गर्दुल्ल्यांच्या अड्ड्यांमध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे घातक रसायनांची वाहतूक आणि अवैध विल्हेवाट रोखण्यासाठी उभारलेली सुरक्षा व्यवस्था आज स्वतःच असुरक्षित बनली आहे. लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या या चौक्यांचा मूळ उद्देश फसला असून, त्या घुसखोरांचे आश्रयस्थान बनल्याने एमआयडीसीच्या भोंगळ कारभाराबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.