विश्रामगृहातून दुचाकीची चोरी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Maharashtra Times
चांदवड : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शासकीय विश्रामगृहातून मोटरसायकलची चोरी झाल्याची घटना घडली आहे.

भरवीर येथील सुदाम वाळुंज यांनी २६ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान हिरो होंडा कंपनीची एच एफ डिलक्स दुचाकी (एमएच १५ जीसी ०८७१) ही शासकीय विश्रामगृहाच्या आवारात लावली होती. मात्र, सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांना आढळून आली नाही. वाळुंज यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.