पुणे : कोथरूड येथील मयूर कॉलनीतील रहिवासी शिरीष गोविंद राजे (वय ८३ वर्षे) यांचे अकस्मात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
शिरीष राजे यांचा वाचनाचा व्यासंग अत्यंत दांडगा होता. ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या विविध प्रश्नांसाठी ते स्थानिक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे पत्रव्यवहार करत असत. ‘महाराष्ट्र टाइम्स’ जेव्हा मुंबईत प्रकाशित होऊन पुण्यात येत असे, तेव्हापासून ते आजच्या पुणे आवृत्तीपर्यंत ते ‘महाराष्ट्र टाइम्स’चे अतिशय नियमित वाचक आणि चाहते होते. त्यांच्या निधनामुळे वाचनप्रेमी आणि मयूर कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पत्रांद्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसुविधा, दैनंदिन अडचणींकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जात असे. सामाजिक घडामोडींची जाण आणि त्यावर विचार मांडण्याची त्यांची परिचित होती.