लीलावती सावे यांना श्रद्धांजली

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Maharashtra Times
छत्रपती संभाजीनगर : राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अतुल सावे यांच्या मातु:श्री लीलावती मोरेश्वर सावे यांचे गुरुवारी निधन झाले. जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

संघटनेचे सचिव शिरीष बोराळकर, उपाध्यक्ष उमेश डबरी, उपाध्यक्ष सचिन मुळे, सहसचिव करण डोगरा व खजिनदार अनिल इरावणे यांनी सावे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत तीव्र संवेदना व्यक्त केल्या. तसेच संघटनेचे कार्यकारिणी सदस्य सुशील वकील, निखिल मिटकर, हेमंत मुळे, सुयोग माछर, सुधीर भालेराव, आजीव सभासद विशाल लोळगे, अरुण गुदगे, दीपक जोशी यांच्यासह आजी-माजी क्रिकेटपटू व आजीव सभासदांनी श्रद्धांजली अर्पण केली. एमसीए अंडर १४ निमंत्रित क्रिकेट स्पर्धेचे सामने सध्या शहरात सुरू आहेत. या सामन्याच्या प्रारंभी लीलावती सावे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.