पेन्शनर्ससाठी येत्या बुधवारी कार्यशाळा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Maharashtra Times
छत्रपती संभाजीनगर : निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनविषयक अडचणींचे निराकरण करण्यासाठी बुधवार (२५ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यशाळा व पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.

महालेखापाल, लेखा व हकदारी, नागपूर आणि वरिष्ठ कोषागार कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत आयोजित कार्यशाळेत ई-पीपीओ, ओजीआरएस , लाइव्ह केस स्टेटस ट्रॅकिंग, पेन्शनर्स समाधान याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत पेन्शन अदालत होणार आहे. निवृत्तीवेतनधारकांनी निवृत्तीवेतनाशी आवश्यक अभिलेखांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.